logo

*शरीरातील या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

*शरीरातील या बदलांकडे दुर्लक्ष करू नका
कॅन्सरचे वेळीच निधान झाले नाही तर, रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होऊन बसतं. बर्‍याच लोकांना वाटतं की, कर्करोगाची लक्षणं प्रगत अवस्थेत दिसून येतात. परंतु, तसं नाही, काही प्रारंभिक लक्षणे देखील या आजाराचे संकेत देतात. अनेकदा असे घडते की आपण या लक्षणांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो.

वजन कमी होणे:-
जर तुमचं वजन झपाट्यानं कमी होत असेल तर, सावध व्हा. हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.

शरीरात सूज किंवा गाठ:-
शरीराच्या कोणत्याही भागात सूज किंवा गाठ दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. ओटीपोटात, स्तनात किंवा अंडकोषात गाठ कर्करोगामुळं असू शकतं.

सतत खोकला:-
सतत खोकला हेदेखील कर्करोगाचं लक्षण असू शकतं. कफ सतत तीन ते चार आठवडे राहिल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. सतत खोकला, कफासह रक्त येणं, श्वास घेण्यास त्रास होणं ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.

तीळ किंवा चामखीळीमध्ये बदल:-
तीळ किंवा चामखीळीमध्ये काही बदल दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. बहुतेक लोकांना ते लक्षात येत नाही. परंतु, ते त्वचेच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. नवीन चामखीळ दिसल्यास किंवा त्वचेवर आधीच अस्तित्वात असलेल्या चामखीळ किंवा तीळाच्या रंगात आणि आकारात बदल होत असल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका.

लघवीमध्ये रक्त दिसणं:-
लघवीतील रक्त हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही आतड्याच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. यासाठी मलविसर्जनाच्या आणि लघवीला जाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. म्हणजेच, तुम्ही नेहमीपेक्षा जास्त वेळा शौचाला/लघवीला जा आणि बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. मूत्रात रक्त येणं हे मूत्राशय किंवा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

अन्न गिळण्यात अडचण:-*
अन्न खाताना दुखणं किंवा गिळताना त्रास होणं, खाताना अन्न पुन्हा पुन्हा घशात अडकणं हीदेखील कर्करोगाची लक्षणं असू शकतात. अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या बाबतीत हे होऊ शकतं.

रात्री घाम येणं:-
रात्री घाम येणं हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचं धोक्याचं लक्षण असू शकतं. हे बहुतेक लिम्फोमाच्या बाबतीत घडतं. या प्रकारचा कर्करोग लिम्फॅटिक प्रणालीमध्ये होतो. लिम्फॅटिक सिस्टीम हे संपूर्ण शरीरात पसरलेल्या रक्तवाहिन्या आणि ग्रंथींचं जाळं असून कर्करोगामुळं यांत अडचणी निर्माण होतात.

वरील एखादा त्रास होतोय, म्हणजे कर्करोग झाला अस नाही, बऱ्याच वेळी आपल्याला छोटीशी समस्या ही असू शकते, म्हणुन डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्याशिवाय कुठलाही विचार किंवा उपाय करू नये.
या सर्व समस्यांपासून दुर राहायचे असेल तर आशुका प्लस सिरप, ईम्मुफिरीन कॅप्सुल घेणे खुप आवश्यक आहे

Nutritionist & Dietitian
Naturopathist
Dr. Bhorkar

0
0 views